शेती असू या परसबाग .तसेच पिके असू या फळबाग.सगळ्याच झाडांना त्यांच्या वाढीसाठी खते आवश्यक असतात.एकून 13 खते झाडांना लागतात.कोण कोणती खते लागत असतात त्यासंबंधी माहिती पाहु.
खतांमध्ये 3 भाग पडतात.
1) मुख्य अन्नद्रव्ये.
2) दुय्यम अन्नद्रव्ये.
3) सूक्ष्म अन्नद्रव्ये.
आता मुख्य अन्नद्रव्यामध्ये 3 प्रमुख अन्नद्रव्ये येतात.
1) नत्र (नायट्रोजन) N या नावानी ओळखले जाते.
2) स्फुरद ( फाँस्फरस) P
3) पोटँश (पालाश) K
थोडक्यात तीन्हींना NPK नावानी ओळखले जाते.
उदा.रासायनिक खतांची मात्रा देताना पँकिंगवर असे लिहलेले असते.19:19:19 नत्र, स्फुरद,व पालाश किती आहे ते कळते.
आता दुय्यम अन्नद्रव्य कोणती ते जाणून घेऊ.
1) कँल्शियम.
2) मँग्नेशिअम.
3) गंधक (सलफर).
सूक्ष्म अन्नद्रव्ये पुढील प्रमाणे.
1) जस्त.
2) लोह.
3) तांबे.
4) बोरान.
5) माँलीबिडीअम.
6) मँगेनीज.
7) क्लोरिन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा