बागकाम करणाऱ्या व परसबाग असणाऱ्यांना खता संबंधीची माहिती मिळावी म्हणून हे लिहित आहे.
आज नायट्रोजन म्हणजे नत्र खता बद्दल माहिती देत आहे.
नत्र (नायट्रोजन ) N.
पिकांच्या वाढीसाठी लागणारे प्रमुख खत म्हणजे नायट्रेजन आहे.
युरिया या रासायनिक खता पासून नायट्रोजन मिळते.
सेंद्रिय पध्दतीने पाहिजे असेल तर ते जीवाणूंच्या मार्फत मिळते.
नायट्रोजन हे हवे मध्ये 78.6% टक्के असते.हे नत्र हवेतून मुळीला मिळते व ते नंतर मुळीकडून पानाला पाठवले जाते.
हवेतील नत्र हे जीवाणूनच्या मार्फत घेतले जाते.
जीवाणू दोन प्रकारचे असतात त्यात पहिला सहजीवी व दुसरा असहजीवी.
पिकांच्या वाढीसाठी तसेच शाखीय वाढीस आवश्यक असते.
हे नत्र आपल्याला जिवामृत व घन जिवामृता मधुन मिळते.
चांगल्या प्रमाणात नत्र मिळाल्यामुळे छान वाढलेला पुदीना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा