नेहमी ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे वाफसा.मग हा वाफसा म्हणजे काय ? तो कसा निर्माण होतो ?
वाफसा हा जमीनीच्या खाली मुळांच्या परिसरात, दोन माती कणांच्या मध्ये ज्या पोकळ्या असतात त्या पोकळ्यांमध्ये 50% पाण्याची वाफ व 50% हवा असते त्या स्थितीला वाफसा असे म्हणतात.
हा हा वाफसा कसा निर्माण करायचा ?
कोणत्याही झाडांची मुळी दुपारी 12. वा.जिथे सावली पडते त्या जागी किंवा कडेला अन्न व वाफसा घेणाऱ्या मुळी असतात. वापसा व अन्नद्रव्ये घेणाऱ्यामुळ्या सावलीच्या आत मध्ये कधीच नसते.जर येथे पाणी दिले तर मुळीच्या तोंडात पाणी दिल्या सारखे होते.पाणी जस जसे खाली जमीनीत जाते तस तसा बुडबुड आवाज येऊन आतील हवा बाहेर जाते.त्यामुळे मुळांना आँक्सीजन मिळायचे बंद होते.
खरेतर वाफसा किती घ्यावा हा अधिकार मुळींचा आहे आपला नसतो.
जास्त पाणी देणे बंद करा.जितका जास्त वाफसा मिळेल तेवढे पिक जोमानी येईल.
कुंडीं मध्ये झाडे लावणाऱ्यांनी पण पाणी प्रमाणात द्यावे की जेणे करून वाफसा मिळेल.
वाफसा जर नाही मिळाला तर पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर झाडे ,पिके,फळबागा व पालेभाजीचे उत्पादन वाढतेच.
Chaan mahiti ahe👍
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत सर
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत
उत्तर द्याहटवा