दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कँल्शीयम नंतर महत्वाचे खत म्हणजे मँग्नेशिय़म.
प्रकाशसंश्लेषन व हरितद्रव्यासाठी मँग्नेशिय़मची गरज असते.
कोणत्याही पिकांना चालते व प्रारंभिक अवस्थे पासून द्यावे लागते.
नेहमी नत्र,स्फुरद व पालाश दिले जाते.दुय्यम अन्नद्रव्ये जास्त लागत नसले तरी द्यावेच लागते व शेतकरी तिकडे लक्षच देत नसतात.
पिकांचा हिरवेपणा वाढतो.उत्पन्नात वाढ होते.
कमी मिळाला तर पाने पिवळी पडतात व पानांच्या शिरा हिरव्या दिसतात व कालंतरानी ते पण पिवळे होऊन गळून पडतात.
कोणताही रोग अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे येतो.
सेंद्रीय कर्बाचे प्रमाण जास्त असेल तर जमीनीतूनच मिळते.
हे खत मिळते कशातून.जर सेंद्रिय पाहिजे असेल तर कुजलेले शेणखत,गांडुळखत,राख तसेच इप्सम साँल्ट मधून मिळते.
व रासायनिक मध्ये मँग्नेशियम सल्फेट मधून मिळते.
विद्यापीठाच्या शिफारशी प्रमाणे मात्रा शेतकऱ्यांनी द्याव्या.
बाजारात बऱ्याच रासायनिक कंपन्यांची खते उपलब्ध आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा