गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्या बारीक दोर्यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. आज आपण या गुळवेलच्या फायद्यांविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत...
डायबिटीजमध्ये फायदेशीर
गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (ऑप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
हृदयरोगात उपयोगी
गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.
रक्ताची कमतरता दूर करते
गुळवेल हे रोग प्रतिकारक क्षमता वाढवते आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ गुळवेलचा रस तुप किंवा मधासोबत मिसळून घेतल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
लठ्ठपणा कमी करते
गुळवेल लठ्ठपणा कमी करण्यातही मदत करते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी गुळवेल आणि त्रिफळा चूर्ण सकाळ आणि संध्याकाळ मधासोबत घ्या. गुळवेल, हरड, बहेडा आणि आवळा मिसळून काढा बनवून यामध्ये शिलाजीत मिसळून गरम करा आणि सेवन करा. हे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा येत नाही.
डोळ्यांसाठी फायदेशीर
गुळवेलचा रस आवळ्यासोबत घेणे डोळ्यांच्या आजारासाठी फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने डोळ्यांचे रोज दूर होतात. यासोबतच नजर चांगली होते. यासाठी गुळवेलच्या रसामध्ये त्रिफळा मिसळून काढा बनवा. या काढ्यामध्ये पिंपळाचे यूर्ण आणि मध मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन करा.
काविळमध्ये फायदेशीर
काविळ झाल्यानंतर गुळवेलचे सेवन करणे खुप फायदेशीर असते. यासाठी एक चमचा गुळवेल चुर्ण, काळी मिरी किंवा एक चमचा त्रिफळा चुर्ण मधासोबत घेतल्याने काविळ रोगापासून आराम मिळतो. किंवा तुम्ही गुळवेलचे पान बारीक करुन त्याचा रस काढून घ्या. एक चमचा रस एक ग्लास मठ्ठ्यामध्ये मिसळून सकाळी प्यायल्याने काविळमध्ये आराम मिळ
मानसिक ताणतणाव कमी होतो
गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.
शुक्रधातूवर्धक (व्रण्य)
स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.
पोटाच्या रोगात फायदेशीर
गुळवेलाच्या रसामध्ये मध मिसळून सेवन केल्याने पोटासंबंधीत सर्व आजार ठिक होतात. यासोबतच गुळवेल आणि शतावरी एकत्र बारीक करुन एक ग्लास पाण्यासोबत मिसळून गरम करा. आता हे काढा झाल्यावर सकाळ-संध्याकाळ प्या.
तुमच्याकडे मिळेल का गुळवेल चे रोप
उत्तर द्याहटवा