बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

जमीनीची मोजमाप

जमीनीचे मोजमाप कसे असते ते पाहु.
१ हेक्टर = १०००० चौ. मी . 
१ एकर = ४० गुंठे 
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट 
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा 
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

Apsa80

Apsa 80
अँम्वे मधले सगळ्यात चर्चेत असलेले प्राँडक्ट म्हणजे Apsa 80.
 हे तीन साईज मध्ये उपल्बध्द आहे.
अर्धा लि.,एक लि.व 5 लिटर.
ह्या प्राँडक्ट बद्दल सगळ्यांना माहित आहे की हे पाण्यात टाकले की पाणी खोलवर नेहते व पाण्याला पसरवते.तसेच किडनाशक औषधात टाकले असता ते सर्व पानंवर पसरते.तसेच तणनाशकात पण टाकले असता तणांचा नायनाट होतो.
पिकांना पाणी दोन पध्दतीने दिले जाते.1) पाटानी पाणी देणे व 2) ठिबक सिंचनातुन.
पाटानी पाणी दिल्यामुळे सगळी मुळे पाण्यात बुडली जातात.खरेतर पिकांना 50% पाण्याची व 50% हवेची गरज लागत असते.
मातीच्या दोन कणांच्या मध्ये गँप असल्यामुळे हवा व पाण्याची वाफ पिकांची मुळे घेत असतात.
जेव्हा पाणी देतो तेव्हा झाडांचीमुळे पूर्ण पणे पाण्यातच राहतात.सगळीकडे शेतात पाणी असल्यामुळे मुळांना हवा घेता येत नाही.त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडतात.वाढ खुंटते.वाफसा न आल्य़ामुळे पिकांनच नुकसान होत.
आता हे वाफसा आणायच काम आपले Apsa80  कसे करते ते पाहु.
पाण्यात एका लिटरला 1ml.  हे प्रमाण पाण्यात टाकल्या नंतर पाणी मुळाजवळ न राहता मुळाच्या खोलवर जाते व ते पाणी शोशून घेणाऱ्या मुळ्यांच्या आजुबाजुला पसरते.रोपां जवळ मलचिंग केल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबते व वापसा लवकर येतो.
झाडांना एकुन 17 अन्नद्रव्ये लागतात.त्यात प्रमुख अन्नद्रव्ये NPK  नावानी ओळखली जातात.
ही सर्व खते पाण्यात विरघळणारी असतात.पण पाण्याचे Ph  जर बरोबर नसेल तर पटकण विरघत नाही.Apsa80  टाकले असता खते विरघळण्यास मदत होते.
दोन फायदे झाले.1 पाणी खोलवर गेले.व दुसरा फायदा खते सम प्रमाणात मिळाले.


गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

Heart-leaved moonseed (गिलोय), (गुळवेल) Plants.


औषधी वनस्पती आहे गुळवेल, ह्या वेलाला गिलाेय पण म्हणतात. याच्या वापराने होतात मोठे फायदे...

गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्‍या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्‍या बारीक दोर्‍यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. आज आपण या गुळवेलच्या फायद्यांविषयी सविस्तर जाणुन घेणार आहोत...

डायबिटीजमध्ये फायदेशीर
गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारे मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (ऑप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
 
हृदयरोगात उपयोगी 
गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदयविकाराच्या रुग्णांनी गुळवेलसत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.

रक्ताची कमतरता दूर करते
गुळवेल हे रोग प्रतिकारक क्षमता वाढवते आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर करते. यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ गुळवेलचा रस तुप किंवा मधासोबत मिसळून घेतल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

लठ्ठपणा कमी करते
गुळवेल लठ्ठपणा कमी करण्यातही मदत करते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी गुळवेल आणि त्रिफळा चूर्ण सकाळ आणि संध्याकाळ मधासोबत घ्या. गुळवेल, हरड, बहेडा आणि आवळा मिसळून काढा बनवून यामध्ये शिलाजीत मिसळून गरम करा आणि सेवन करा. हे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा येत नाही.

डोळ्यांसाठी फायदेशीर
गुळवेलचा रस आवळ्यासोबत घेणे डोळ्यांच्या आजारासाठी फायदेशीर असते. याचे सेवन केल्याने डोळ्यांचे रोज दूर होतात. यासोबतच नजर चांगली होते. यासाठी गुळवेलच्या रसामध्ये त्रिफळा मिसळून काढा बनवा. या काढ्यामध्ये पिंपळाचे यूर्ण आणि मध मिसळून सकाळ-संध्याकाळ सेवन करा.

काविळमध्ये फायदेशीर
काविळ झाल्यानंतर गुळवेलचे सेवन करणे खुप फायदेशीर असते. यासाठी एक चमचा गुळवेल चुर्ण, काळी मिरी किंवा एक चमचा त्रिफळा चुर्ण मधासोबत घेतल्याने काविळ रोगापासून आराम मिळतो. किंवा तुम्ही गुळवेलचे पान बारीक करुन त्याचा रस काढून घ्या. एक चमचा रस एक ग्लास मठ्ठ्यामध्ये मिसळून सकाळी प्यायल्याने काविळमध्ये आराम मिळ

मानसिक ताणतणाव कमी होतो
गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो. असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम अ‍ॅड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या अ‍ॅड्रिनॅक्लीज या अंत:स्रावावर नियंत्रण येते. या अंत:स्रावामुळे यकृतातून रक्त प्रवाहात जी शर्करा मिसळली जाते. गुळवेलीमुळे इन्शूलिन या अंत:स्रावाची शर्करेवर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्तामधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेहीला चांगलाच उपयोग होतो.
 

शुक्रधातूवर्धक (व्रण्य)
स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे. गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.

पोटाच्या रोगात फायदेशीर
गुळवेलाच्या रसामध्ये मध मिसळून सेवन केल्याने पोटासंबंधीत सर्व आजार ठिक होतात. यासोबतच गुळवेल आणि शतावरी एकत्र बारीक करुन एक ग्लास पाण्यासोबत मिसळून गरम करा. आता हे काढा झाल्यावर सकाळ-संध्याकाळ प्या.

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

मलचिंग केल्यामुळे होणारे फायदे.

मलचिंग करणे म्हणजे काय ?

झाडाच्या बुंध्या जवळ वाळलेला पालापाचोळा किंवा वाळलेला काडी कचरा टाकून जमीन किंवा कुंडी झाकून टाकणे.
मग हे मलचिंग का करायच ?
उन्हाळ्यात जमिनीत असलेल्या पाण्याची वाफ होते व जमिनीतला ओलावा नष्ट होतो. मलचिंग केल्यामुळे बाष्पीभवन थांबते.खालून वर येणाऱ्या पाण्याची वाफ काडी कचऱ्यामुळे थांबते.नंतर रात्री वाहत्या वाऱ्यामधुन मिळणारे पाणी त्या मलचिंग वर पडते.व तो काडी कचरा ओला होतो.व त्यातले पाणी त्या रोपाला मिळते.
असा डबल फायदा मलचिंगमुळे मिळतो.
आता प्लँस्टिक पेपरचा वापर करून शेतात मलचिंग केले जाते.मलचिंग पेपर वर मलचिंग केल्यामुळे तण येत नाही.उत्पनात वाढ होते.

गुरुवार, ३० जुलै, २०२०

शेतमाल विक्री करण्यात पारंगत व्हा.


शेतकरी मित्रांनो तुम्ही पिकवण्यात जसे प्रविण
आहात तसेच तुम्ही शेतमाल विकण्यात प्रविण व्हा.
तुम्ही कसे दिसता,तुम्ही कसे कपडे घालता, तुमच बोलणे कसे आहे ह्या कडे लक्ष देऊ नका.
तुम्ही पिकवलेला माल किती लोकां पर्यंत जातो त्यावर लक्ष केंद्रित करा.
तुमचे स्वताचे गिऱ्हीक तयार करा.लोकांना कळले पाहिजे तुमच्याकडे काय काय शेतमाल उपलब्ध आहे तो.आज सोशल मिडीयाचा पण वापर करू शकता.
घरा जवळील एरिया पासून सुरवात करा.हळूहळू तुमच्या कडे खूप मोठा ग्राहक वर्ग तयार होईल.
ज्यावेळी तुम्ही काय विकायला जाताल त्यावेळी लोकच तुम्हाला नविन नविन आँर्डर देतील.त्या प्रमाणे तुमचे मन विचार करायला लागेल.
सरकार तुमच्या मालाला भाव देत नाही अस म्हणायची वेळ येणार नाही.
तुम्ही माती पासून शेतमाला पर्यंत खूप काही विकू शकता.
गाईच्या गोमूत्रा पासून दूधा पर्यंत काहीही विकू शकता.
कोंबडीच्या खता पासून अंडी पर्यंत काहीही विकू शकता.
मी हे तुम्हाला कल्पना येण्यासाठी लिहले आहे.
रोज फक्त दोन तास तुम्ही शेतमाल विकण्यासाठी वेळ द्या.लोकांनी माल घेऊ अगर न घेऊ .तुमच्याकडे काय आहे ते कळले पाहिजे.
हळूहळू विकण्याची कला विकसीत करून घ्या.
बोलणाऱ्याची माती विकली जाती.हे लक्षात ठेवा.

रत्नाकर शंकराराव जाधव

बुधवार, २९ जुलै, २०२०

झांडाची व पिकांचीअन्नद्रव्ये कमतरा कशी ओळखाल ?


आपण वनस्पती मधील अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल.
1:  नत्र.
रोपांची वाढ खुरटलेली राहते.
पाने लहान व फिक्कट हिरवी होतात.
पानांच्या शिरा काही वेळा निळ्या दिसतात.
कधी कधी सरसकट पाने पिवळी दिसतात.
2: फाॅस्परस.
पाने फिक्कट हिरवी ऊभट व अरूंद दिसतात.
खोङाच्या व पानाच्या खालच्या बाजूस जांभळट
रंग दिसतो.
रोप खुरटलेली व खोङ पातळ बारीक दिसते.
फळे,रंगहिन होतात.
3:पालाश.
कमतरतमुळे हरीत द्रव्य ,कङेकङील हिरवा
जाऊन पिवळसर लाल होतात.
जून्या पानांपासून ते
शेंङ्याकङील पाने सुकतात.
फळांचा आकार लहान
रहातो.
ऊत्पादनात घट होते.
फळांची गोङी कमी होऊन आम्लाचे प्रमाण वाढते.
फळांंचा टिकाऊपणा कमी होतो.
4: कॅल्शिअम.
फळांच्या खालील बाजूस खोलगट काळा चट्टा पङतो.
फळे नरम पङून लहान ,सूकलेली दिसतात.
फळे तङकतात कमी टिकतात.
शेंङा वाळतो.
फळांच्यावरील शेंंङ्याकङची बाजू सूकते.
5:मॅग्नेशिअम.
पाने कङापासून पिवळी पङतात.
पानांच्या शिरा हिरव्या,दिसतात.
फळे निस्तेज व मऊ पङतात.
6:सल्फर.
खालची पाने हिरवी व वरची पाने, पिवळसर होतात.
पान सूकून व नंतर गळतात.
शेंंङ्याकङील नविन पाने व लहान पाने दूमङलेली दिसतात.
मूख्य पानांच्या शिरा जांभळ्या दिसतात.
7: मॅंगनिज.
शिरा हिरव्या व पानांचा भाग पिवळा पङतो.
फळांच्या गुणवत्तेवर ऊत्पादन कमी मिळते.
पानांवर चौकटिदार नक्शी दिशते.
7: झींक.
रोपे खुरटलेली राहतात.
पानांतील शिरा चट्यासारख्या पिवळ्याख पङतात.नंतर पान सूकतात.
फुले व फळे कमि प्रमाणात लागतात.
फळांची साल पातळ रहाते.
फळांचा आकार लहान रहातो.
8:बोराॅन.
नविन शेंङ्याकङील वाढ खुंटते.
फळांवर तांबङे ठिपके
 पङून फळे तङकतात.
पानांवर सूरकुत्या पङून पिवळे दिसतात.
पाने कडक लागतात.
नवीन पानांची टोके तडकतात.
9: काॅपर.
कोवळ्या पानांतील हरीत द्रव्यांचा अभाव दिसतो.
पान पिवळी पडून वाढ ,खुंटते,नंतर गळून पडतात.
पानांचा तळाकडील भाग हिरवा रहातो.
10: लोह.
पानांच्या मुख्य शिरा हिरव्या रहातात.
शिरांचा मधील भाग पिवळट पांढरा दिसतो.
फळांचा आकार लहान रहातो.
अशा प्रकारे कमतरता ओळखुनच योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन  करा.
11:मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

                  

सोमवार, २७ जुलै, २०२०

कोंबडी विष्टा खत:


 कोंबडी विष्टा खत : 
कोंबडी खताला शेतकरी नेहमी वापरतात.कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये द्रव व घन स्वरूपातील विष्ठा एकत्र साठवलेली असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे.
नविन रान तयार करताना तुम्ही हे टाकून शेतीची मशागत करू शकता. कोंबडीची विष्ठा जमिनीत घातल्यानंतर ताबडतोब कुजते व त्यातील अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणून पेरणीपूर्वी हे खत घातल्यास पिकांवर चांगला परिणाम दिसून येतो. या खतांमध्ये पिकांना आवश्यक असलेल्या दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणही अधिक असल्यामुळे ते एक उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे. 
पिकांना लागणारे नत्र ,स्फुरद,पालाश यातून मिळते.
पिके चांगली जोमानी वाढतात.

रविवार, २६ जुलै, २०२०

लेंडीखत



लेंडीखत : 
आपल्या देशात शेळ्या मेंढ्यांची संख्या लक्षात घेता त्यांच्या विष्टेपासून देखील चांगल्या प्रतीचे लेंडीखत तयार करता येते यामध्ये सर्वसाधारणपणे ०.६५ टक्के नत्र, ०.५० टक्के स्फुरद आणि ०.०३ टक्के पालाश ही अन्नद्रव्य मिळतात. गाई - म्हशींच्या शेणापेक्षा मेंढ्यांच्या शेणापासून मिळणाऱ्या खतांची प्रत चांगली असते. मेंढ्यांच्या ताज्या लेंडीत पालाश अन्नद्रव्याव्यतिरिक्त सर्व अन्नद्रव्य संपन्न असतात, त्या खालोखाल शेळ्यांच्या लेंड्यात असते.
पिक घेण्या अगोदर वावरात/ शेतात शेळ्या मेंढ्या बसवल्या जातात.
पिकांची वाढ चांगली होती तसेच फळांचा रंग ,आकार ,चव ,काळोखी वाढते.

शनिवार, २५ जुलै, २०२०

वाफसा.

वाफसा
नेहमी ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे वाफसा.मग हा वाफसा म्हणजे काय ? तो कसा निर्माण होतो ?
वाफसा हा जमीनीच्या खाली मुळांच्या परिसरात, दोन माती कणांच्या मध्ये ज्या पोकळ्या असतात त्या पोकळ्यांमध्ये 50% पाण्याची वाफ व 50% हवा असते त्या  स्थितीला वाफसा असे म्हणतात.
हा हा वाफसा कसा निर्माण करायचा ?
कोणत्याही झाडांची मुळी दुपारी 12. वा.जिथे सावली पडते त्या जागी किंवा कडेला अन्न व वाफसा घेणाऱ्या मुळी असतात. वापसा व अन्नद्रव्ये  घेणाऱ्यामुळ्या सावलीच्या आत मध्ये कधीच नसते.जर येथे पाणी दिले तर मुळीच्या तोंडात पाणी दिल्या सारखे होते.पाणी जस जसे खाली जमीनीत जाते तस तसा बुडबुड आवाज येऊन आतील हवा बाहेर जाते.त्यामुळे मुळांना आँक्सीजन मिळायचे बंद होते.
खरेतर वाफसा किती घ्यावा हा अधिकार मुळींचा आहे आपला नसतो.
जास्त पाणी देणे बंद करा.जितका जास्त वाफसा मिळेल तेवढे पिक जोमानी येईल.
कुंडीं मध्ये झाडे लावणाऱ्यांनी पण पाणी प्रमाणात द्यावे की जेणे करून वाफसा मिळेल.
वाफसा जर नाही मिळाला तर पाने पिवळी पडतात व वाढ खुंटते.
पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले तर झाडे ,पिके,फळबागा व पालेभाजीचे उत्पादन वाढतेच.